सोलापूर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयासंबंधी….

सोलापूर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात ” सोलापूर महानगरपालिकेच्या ” समोरील बाजूस असणाऱ्या महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशालेच्या आवारात स्थित असून, या कार्यालयामार्फत सोलापूर जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी औधोगिक प्रशिक्षण संस्था, तांत्रिक प्रशाला,अल्प मुदतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था,द्विलक्षी अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्था यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात येते.

  • वेगवेगळ्या व्यवसायातील उद्योगासाठी  कुशल कामगारांचा स्थिर प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी.
  • कामगारांच्या व्यवस्थित प्रशिक्षणाने गुणवत्ता आणि औद्योगिक उत्पादन किती प्रमाणात वाढवावे यासाठी.
  • शिक्षित तरुणांमधील बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांना उपयुक्त औद्योगिक रोजगार उपलब्ध करून देणे.